भूमिका

असहमतीवर वाढती हिंसा अनाकलनीयः उदय प्रकाश

असहमतीवर वाढती हिंसा अनाकलनीयः उदय प्रकाश
मुलाखतकार

 गेले बरेच दिवस आपल्याकडे साहित्यिकांमार्फत पुरस्कार परत करण्याचे सत्र चालू होते. हे सत्र सुरू झाले ते वरिष्ठ लेखक उदय प्रकाश यांच्यापासून. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदय प्रकाश यांनी पुरस्कार परत केला होता. याच विषया संदर्भात न्युजक्लिक ने उदय प्रकाश यांच्याशी केलेली ही बातचीत. सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत हल्ले होताना दिसताहेत, हे अकल्पनीय आहे, असे ते या मुलाखतीत म्हणाले. याप्रकारानंतरही आपले सरकार मूग गिळून गप्प राहून या गोष्टींना एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की, पुरस्कार परत करताना आपला हा निषेध एवढं मोठं रूप धारण करेन याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. पण यातूनच सिद्ध होतंं की जनमानसात या घडणा-या प्रकाराबद्दल किती रोष आहे ते. त्यांचं असेही म्हणणं आहे की सद्यस्थिती पाहता स्वायत्त संस्था आणि सरकार यात काहीच फरक उरलेला नाहिये, साहित्य अकादमी कलबुर्गींच्या हत्येनंतरही मौन बाळगून आहे, हे त्याचच उदाहरण आहे. त्याचबरोबर यापुढे साहित्याकार आणि कलेच्या मार्फत हा विरोध असाच कायम राखण्याच्या संदर्भातदेखील ते बरंच काही बोलले. याबाबतीत अजून जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.
मुलाखत : उदय प्रकाश
स्त्रोत : न्युजक्लिक
 

Comments

More in भूमिका