भारत

इन फोकस : शरद पवार

इन फोकस : शरद पवार
मुलाखतकार

शरद पवार कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १९९६ साली उभे होते. ज्यामुळे  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे (आय कॉंग्रेस) चे तत्कालीन प्रमुख सीताराम केसरी यांच्यावर दबाव आला होता. ते कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे योग्य दावेदार आहेत का? ते जिंकतील का? जर जिंकले तर कॉंग्रेसमध्ये ते काय बदल आणू इच्छितात यावर प्रकाश टाकणारी १९९६ साली घेतलेली मुलाखत. करन थापर यांनी आपल्या खुमासदार शैलीत इनफोकस साठी ही मुलाखत घेतली आहे. शरद पवारांनी या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांवर एक नजर टाकूयात.

कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन हेच ध्येय
खूप दिवस कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवन कसे करावे हि चर्चा सुरु होती . कॉंग्रेसमधल्या प्रत्येकाला असे वाटत होते की सध्याचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही आणि पक्ष जनमानसापर्यंत पोहोचत नाहीये. गेल्या काही निवडणूकांमध्ये कॉंग्रेसची स्थिती महाराष्ट्र काय किंवा हिंदी भाषिक राज्य असोत . ठीक नाहीये. अशीच परीस्थिती राहिली तर कॉंग्रेसच्या अडचणीत भरच पडेल. पक्ष निष्प्रभ झाल्यामुळे जातीय, प्रांतिक तेढ निर्माण करणारे घटक निर्माण झालेत.ज्यामुळे एकात्मतेवर गदा आली आहे. कॉंग्रेसचा विकास करणे आवश्यक आहे. देशभर कॉंग्रेस वाढली पाहिजे.

मी कधीच हरलो नाही
जिंकणे आणि हारणे ही खूप पुढची गोष्ट आहे पण माझ्याबाबतीत सांगायचं तर मी जितक्या निवडणुका लढलो आहे त्यातील कोणतीच निवडणूक आजपर्यंत मी हारलो नाही.सगळ्या राज्यातील कॉंग्रेसच्या लोकांसोबत मी चर्चा केली आहे. त्यांची मानसिकता पाहता मी हरणे केवळ अशक्य आहे.१०० टक्के जिंकणार. कॉंग्रेसचे रूप बदलून कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणार.मी प्रत्येक निवडणुकीत त्या ठिकाणची रणनीती ठरवून काम करतो.

सोनिया कायम न्युट्रल
सोनियांचा पाठींबा हा अध्यक्षपदाबाबत बोलताना वेगळा विषय आहे त्यांच्या नावाने विवाद करणे योग्य नाही. त्या कुणासोबत आहेत याविषयी काही बोलून उपयोग नाही. त्या कायम न्युट्रल असतात.

शरद पवार विश्वासू नाही हा केवळ अपप्रचार
गांधी परिवाराचा विश्वास पवारांवर नाही हा अपप्रचार आहे. ते खरे नाही. कॉंग्रेस वर्किंग कमिटी साठी जेव्हा मी लढलो तेव्हा असा प्रचार करण्यात आला होता पण मला चांगली मते मिळाली.

मला अनेकांचा पाठींबा
कितीही लोक लढले तरी मतांवर फारसा परिणाम होणार नाही.पक्षाची जबाबदारी घेणारी व्यक्ती देशभर जावी. तिने सगळी जबाबदारी सांभाळावी अशी कॉंग्रेसमधल्या लोकांची अपेक्षा आहे. मला कॉंग्रेस नेते आणि डेलिगेट्स यांचा पाठींबा आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही.ज्यांना कॉंग्रेसमध्ये बदल हवा आहे ते सगळे माझ्या सोबत आहेत.गटबाजी संपवायची आहे. मी निवडून आल्यावर सत्तेचे विकेंद्रीकरण करणार आहे.कलेक्टीव लीडरशिप आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना बदल हवा आहे. मी नावे घेणार नाही कारण मतदान होण्याआधी नावे घेणे योग्य ठरणार नाही.

एकच ध्यास कॉंग्रेसचा विकास
अध्यक्ष झाल्यावर फक्त कॉंग्रेसच्या विकासावर लक्ष देणार. अन्य  कोणत्या पदासाठी  मी इच्छुक नाही. मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही.कॉंग्रेसची परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. पक्षाकडून नीट कार्यक्रम होत नाहीत. नेतृत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.

केसरी यांना हटवण्याची मानसिकता नाही
केसरी यांना हटवण्याची मानसिकता नाही.ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मार्गदर्शन करावे.केसरी यांची तब्येत ठीक नसते. त्यांनी जबाबदारी स्वीकारतानाच सांगितल होत कि नव्या पिढीकडे मला नेतृत्व द्यायचे आहे मी प्रभारी अध्यक्ष म्हणून फार काळ काम करणार नाही. त्यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात योगदान आहे. पण सध्या पक्षामध्ये एका पिढीचे अंतर पडले आहे. अध्यक्षाने देशभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे.

३ गोष्टींना प्राधान्य
अध्यक्ष झाल्यावर प्राधान्य द्याव्या अशा ३ गोष्टी- १.कॉंग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करणे. २ पक्षापासून दूर गेलेले अल्पसंख्यांक, एससी, एसटी आणि तरूण वर्ग यांना पुन्हा पक्षाकडे वळवणे. ३ पक्षाप्रती लोकांचा विश्वास वाढावा यासाठी काम करणे पक्षाची नवी नीती तयार करणे. संघटना पुन्हा बांधण्याची गरज आहे. सगळ्या लोकांना जोडले पाहिजे. पक्ष अधोगतीला जात आहे. पक्षाचे लोक जिथे संघर्ष करत आहेत त्यांना नेत्यांनी मदत केली पाहिजे.

सुधारण्यासाठी काही काळ जावा लागेल
कॉंग्रेसला फक्त लढायला नाही तर जिंकायला शिकवायचे असेल तर खूप काम करावे लागेल,.कॉंग्रेस सुधारण्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.

अशाप्रकारे करन थापर यांच्या अडचणीत टाकण-या प्रश्नांना शरद पवार यांनी कशा प्रकारे चुकवत आपल्याला हवी तिच उत्तरे दिली, ते पाहण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.

 

मुलाखत :  शरद पवार
मुलाखतकार : करन थापर
स्त्रोत :  इन फोकस

 

Comments

More in भारत