आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व

मी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी

मी चित्रपट करण्यासाठीच जगतोय – संजय भन्साळी
मुलाखतकार

‘आय हॅव्ह टू गिव्ह माय बेस्ट आणि हे आयुष्यभरासाठी आहे. फिल्म… मला असं वाटतं की, हे माझं आयुष्य आहे. मी फिल्म करण्यासाठीच जगतोय. ‘ – संजय लीला भन्साळी

बाजीराव मस्तानी सारखा चित्रपट ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं, ज्याच्यावर बरीच टिकाही करण्यात आली. त्यात दाखवल्या गेलेल्या ऐतिहासिक प्रसंगांकडे बोट दाखवत त्याला तीव्र विरोधही करण्यात आला. परंतु तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आणि जब्बर कमाई केली. तर असा हा चित्रपट ज्यांच्या नजरेतून साकारला गेला ते म्हणजे संजय लीला भन्साळी. खामोशी, हम दिल दे चुके सनम, देवदास, ब्लॅक, सावरिया, गुजारिश, रामलीलासारखे फिल्मी ड्राम्याने पुरेपुर-रंजक चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. भव्यदिव्य सेट, अफाट खर्च, काही तरी नवीन प्रयोग यासाठी संजय नेहमीच ओळखले जातात. तर अशा या दिग्दर्शकाची ETC चॅनलवर घेण्यात आलेली ही खास मुलाखत. एक दिग्दर्शक म्हणून ते कसे आहेत, एखादी फिल्म कशी पूर्णत्वास येते, काय-काय समस्या त्यावेळेस निर्माण होतात, निर्मात्याची भुमिका पार पाडताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते अशा सर्व प्रश्नांना हात घालत संजय भन्साळींविषयी बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. या मुलाखतीचे शब्दांकन पुढीलप्रमाणे – 

कोमल नाहटा : एक असे दिग्दर्शक ज्यांच्या सोबत काम करायला प्रत्येक कलाकार उतावळा असतो, ज्यांचे चित्रपट ‘लार्जर दॅन लाईफ ‘असतात, ज्यांचे सेट्स पाहून डोळे चक्रावतात तर आपल्यासोबत आहेत  संजय लीला भन्साळी. सर तुम्ही फक्त दुस-यांनाच नर्व्हस करतात की स्वतः पण असतात ?
संजय : नाही, मी देखील खुप नर्व्हस असतो. मी खुप हाई स्ट्रॉंंग माणूस आहे . इमोशनली जे पण करतो ते, जिथे पण जातो, तिथे मी माझं १००% देतो. हे करताना स्ट्रेस तर येतोच आणि कामाच्या एक्साईटमेंटमध्ये तर नर्व्हस असणं फार गरजेचं आहे. आय थिंक बीइंग नर्व्हस ईज व्हेरी इम्पॉर्टन्ट व्हेन यू डू अ वर्क. मी आताही शूटिंगला जातो, तेव्हा पण माझी ही पहिलीच फिल्म असल्यासारखा नर्व्हस असतो. हे नीट होणार की नाही असं सारखं वाटतं असतं, तर नर्व्हस असणं हे माझ्यासाठी साईन आहे की, हो माझ्यात अजूनही पॅशन आहे, जूनून आहे, काही तरी चांगलं करून दाखवण्याची उमेद आहे माझ्यात.
कोमल नाहटा :  तुम्ही तुमचा हा नर्व्हसनेस तुमच्या अॅक्टर आणि क्रू मध्ये पण पसरवतात का ?
संजय : नाही नाही. ते पाहतात की मी खूप मेहनत करतो, मग ते पण दुप्पट मेहनत करतात. आणि एक दिग्दर्शक म्हणून एखादा सीन शूट करताना, गाणं रेकॉर्ड करताना मी खूप मेहनत करत असतो. त्यामुळे त्यांनी तेवढंच मनापासून काम करावं अशी माझी अपेक्षा असते. आणि माझ्या टीमला माझं कायम हेच सांगणं असतं की जे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे ते आपल्याला गाठायचं आहे. तर हे करत असताना ते होणार की नाही या टेन्शनमुळे सगळेच नर्व्हस असतात. तर ते खूप गरजेचं आहे. अजून काय बेस्ट आपण देऊ शकतो हे शोधत असताना खूप काम करावं लागतं. त्यामुळे काही जण म्हणतातही की, मी खूप त्रास देतो, खूप मेहनत करून घेतो. मला कलाकार फार आवडतात. माझ्या चित्रपटातील कलाकार हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील फार खास व्यक्ती असतात. आणि चांगला कलाकार असेल तर त्याला प्रेम देणं, त्याला समजून घेणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना काय हवं-नको पाहणं, त्यांचे प्लस पॉइंट, मायनस पॉइंट, त्यांच्या दुखऱ्या नसा, त्यांची क्षमता ह्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं असतं.
कोमल नाहटा : रणवीर सिंगचे काही मायनस पॉइंट्स आहेत ?
संजय : त्याच्यात खूप एनर्जी आहे, मला असं वाटतं की तोच त्याच्यातील मायनस पॉइंट आहे. तो येतानाच खूप जोशात असतो. अगदी रात्री १० वाजता सुद्धा तो अगदी त्याच जोशात असतो. खुप उत्साह, पागलपण आहे त्याच्यात. त्याची ही एनर्जी योग्य ठिकाणी, योग्य तेवढी वापरून घेण्यात माझी एनर्जी खूप खर्च होते. तर हाच त्याचा एक मायनस पॉइंट आहे.
कोमल नाहटा : बाजीराव मस्तानी हा चित्रपट फार मनाच्या जवळचा आहे आणि तो अनेक वर्षांपासून आहे. अल्टीमेटली तो आता साकार झालाय. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक म्हणून असं कधी वाटलं नाही का की आता खूप वर्ष झालेत आता नको करूयात हा चित्रपट ?
संजय : नाही. मला वाटतं की त्या स्क्रिप्टमध्ये तेवढी ताकद होती, त्या पात्रांमध्ये तेवढी पॉवर आहे, बाजीराव , मस्तानी आणि काशीची जी प्रेमकथा आहे ती खूप सुंदर आहे. मी कधी वॉर फिल्म केली नव्हती. कोणत्या योद्ध्याची फिल्म कधी केली नव्हती. तर ते एक मनात राहिलं होतं. अगोदर हयांच्यासोबत कास्टींग केलं पण काही जमलं नाही, नंतर दोन फिल्म केल्या, तिस-यांदा पुन्हा प्रयत्न केला. तर असा तीन वेळा मी प्रयत्न केला होता. मी असं ऐकलंही होतं की कमल अमरोहींची इच्छा होती बाजीराव मस्तानी करण्याची. पण ते शो करू शकले नाही, मनमोहन देसाई साहेब पण हा प्रयत्न करणार होते, मुजफ्फर अली साहेबांनी तर कास्टींग पण केली होती, स्मिता पाटील, रेखा आणि अमितजींची. मी तर तीन वेळा फसलो होतो. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग वाटलं. आणि हे सगळं १२ वर्ष सतत डोक्यात राहिलं. स्क्रिप्ट झाली नाही, हा चित्रपट झाला नाही, त्यामुळे सतत त्याचा शोध घेत राहिलो.  जर तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट होणार हे नक्की असते.
कोमल नाहटा : प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की आपण संजय लीला भन्साळींसोबत काम करावं. तरी तुमच्यासोबत असं का होतं ? आणि हे पहिल्यांदाच होत नाहीये. तुम्ही आधी ठरवता ह्या कलाकारासोबत काम करूयात पण तसं काही होत नाही.
संजय : जसं की ?
कोमल नाहटा : आता हे बाजीराव मस्तानीचंच पहा ना. असं का झालं ? कारण मला असा कोणताच कलाकार वाटत नाही ज्याला तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा नसेल.
संजय : नाही असंच काही नाहीये. मला असं वाटतं की प्रत्येक फिल्मची डेस्टीनी असते. काही गोष्टी मिळाल्या की फिल्म बनते नाही मिळाल्या तर होत नाही . फिल्म मेकरच नशीब असतं. माझ्या हातात स्ट्रगल खूप लिहिलेलं आहे. मेहनत खूप लिहिलेली आहे. तर तेच खरं.
कोमल नाहटा : स्ट्रगल आणि मेहनत यामुळे कारण तुम्ही सहजा सहजी हार मानत नाही.
संजय :  आय हॅव्ह टू गिव्ह माय बेस्ट आणि हे आयुष्यभरासाठी आहे. ही फिल्म कुणी ५० वर्षांनी पाहिल, कुणी १०० वर्षांनी. तर मला असं वाटतं की हे माझं आयुष्य आहे. मी फिल्म करण्यासाठीच जगतोय. मला नेहमी टेन्शन असतं की त्या गाण्यात ते मंजिरेचं टिंग नीट वाजलं की नाही, गिटार कसं वाटतंय, त्यासाठी मी तासन्तास मिक्सिंग करतो. मला काहीतरी क्रिएट करायला फार आवडतं. आणि ते खूप आतून आलेलं असतं. आणि हे मी कुणाला तरी सिद्ध करुन दाखवण्यासाठी नाही करत. माझ्यात खूप पॅशन आहे आणि माझं त्यावर खूप प्रेम आहे .
कोमल नाहटा : हे आय फॉर डिटेल जे आहे ते  तुमच्या लहानपणापासून आहे का ?
संजय: लहानपणापासून तर नाही. मला वाटतं की काम करताना जस जसा अनुभव वाढतो तसतसं तुमची डिटेल वाढते. आता जे मी खामोशीमध्ये केलं आणि आता जो मी बाजीराव मस्तानी केलायं यात खूप फरक आहे. तर तुमचा अनुभव वाढतो, तुम्ही त्यातून काहीतरी सतत शिकत असता. प्रत्येक गोष्ट मला ही व्यवस्थित होणं अपेक्षित असतं.
कोमल नाहटा : लहानपणापासून ?
संजय : हो, लहानपणापासून  एव्हरीथिंग मॅटर्स  टू मी जे माझ्या डोळ्यांसमोर येतं ते……
कोमल नाहटा :  इट बेटर बी परफेक्ट.
संजय : परफेक्ट तर माहित नाही पण मला हवं तसं असावं.
कोमल नाहता : एक्झॉस्टिंग आहे हे तुमच्यासाठी, कारण तुम्ही चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्टीत सहभागी असतात.
संजय : बिलकुल. तुम्हाला काय वाटतं ब्लड प्रेशर असंच थोडी वाढतं. खूप टेन्शन असतं, प्रचंड मेहनत असते, पण तुम्ही ते करता. आता बाजीराव मस्तानी फिल्म मी एका वर्षात पूर्ण केली. नोव्हेंबरमध्ये मी शुटिंग सुरू केली आणि डिसेंबरमध्ये फिल्म रिलीज सुद्धा केली. युद्धाचे बरेच सीन, अॅक्शन सीन, मोठमोठे सेट, लव्ह सीन, ह्या सगळ्यात खूप मेहनत करावी लागते. हे करताना मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही, आरामाची गरज वाटत नाही.
कोमल नाहटा : विषय निवडताना त्यामागे काय विचार असतो ?
संजय : विषय निवडण्यामागे एक स्पॉन्टिनिटी असते. काही विषय मी फार आधी निवडलेले असतात. मग त्यात बरीच भर होत होत ते शेवटापर्यंत येतात. जेव्हा मी खामोशी करत होतो तेव्हा मी ब्लॅक विषयी विचार केला होता. पण खामोशी बॉक्स ऑफिसवर चालला नाही . मग गियर चेंज करून हम दिल दे चुके च्या दिशेने मी पुढे सरकलो. तर ब्लॅक त्यावेळी मी लिहिली होती. बाजीराव मस्तानी १२ वर्षांपुर्वी लिहिली होती. गुजारिश पण फार आधी लिहिली गेली होती. रामलीला मी हम दिलच्या ऐवजी करणार होतो.
कोमल नाहटा : त्यावेळेला ?
संजय : हो, त्यावेळेला. तर अशा ब-याच कथा लिहून तशाच राहतात, काही डोक्यात असतात, त्यांचं पालनपोषण करून ते वाढवून मग त्यातून फिल्म होते.
कोमल नाहटा : तर तुम्ही अशाप्रकारे पूर्ण स्क्रिप्ट तयार करतात की फक्त एक रफ आयडिया ?
संजय : रफ आयडिया. बाजीराव मात्र पूर्ण स्क्रिप्ट रेडी होती. त्यावेळेला दि़ड वर्ष तर स्क्रिप्ट करण्यातच गेलं होते. खूप रिसर्च, खूप मेहनत करावी लागली. लिहिलेलं असल्यामुळे मला फक्त ते पुढे न्यायचं होतं.
कोमल नाहटा : पिरिएड फिल्म असल्यामुळे कन्टेम्पररीनेस..
संजय : प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, तुम्ही कोणत्या पध्दतीने फिल्म करता, कसे लिहिता, एडिट कशी करता कारण आजकाल कुणी ३ तास फिल्म पहायला बसत नाही. त्यामुळे ते सगळं दोन ते अडीच तासात बसवायचं असतं. त्यामुळे काय बरोबर, काय चुक हे समजून एडिट करण्यासाठी तुम्हाला सतत काम करावं लागतं.
कोमल नाहटा : तर संजयजी तुम्ही फिल्म मेकिंगमध्ये एवढे गुंतलेले असतानाही प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीचा अंदाज कसा ठेवता ?
संजय : नाही, मला खरंच याविषयी काही माहीत नाही. मी थिएटरमध्ये जाऊन कधी फिल्म पाहत नाही.
कोमल नाहटा : हो.. मला माहीतीये तुम्ही जात नाही ना फिल्म पाहायला थिएटरमध्ये…
संजय : हो नाही जात. आणि माझी फिल्म असेल तर नक्कीच  जात नाही.
कोमल नाहटा : असेही तुम्ही जात नाहीच. तर तुम्ही हिंदी फिल्मच पाहत नाही कि कधीतरी घरीच फिल्म पाहता ?
संजय : हो, कधीतरी घरी पाहतो. पण मला दुस-यांच्या फिल्म पाहिल्यावर त्या फार छान असतील तर मी खूप नर्व्हस होतो. कि अरे यार, या माणसाने तर फारच सुंदर फिल्म केलीये. आता मी काय करू, तेव्हा मात्र मला फार राग येतो. मला फार ईर्ष्या वाटते. त्यापेक्षा ती फिल्म न पाहता त्या भावनांना तसंच मनाच्या कोप-यात ठेवलेलं बरं. नुकतीच मी पीकु. पाहिली.
कोमल नाहटा : कशी वाटली ?
संजय : खूपच भारी. तेव्हा मी दिपिकाला बोललो पण की, मला अजिबात नाही आवडलं की तू पीकू मध्ये एवढं चांगलं काम केलंस. मला असं वाटतं की मला फिल्म करायच्या वेळेस मला जे करायचंय ते मी करत असतो, तुम्हाला काय वाटतं, प्रेक्षकांना काय हवंय ह्याचा विचार करत बसलो तर मला वाटतं की मी फिल्मच  करू शकणार नाही.
कोमल नाहटा : तुम्ही थिएटरमध्ये सिनेमा पाहत नाही . पण सध्या कोणाचा सिनेमा गाजतोय, बाजारात काय स्थिती आहे, सध्या कोणत्या सिनेमाने किती गल्ला केला ह्याकडेही तुमचं लक्ष नसतं की असतं, की ते पण तुम्हाला काही माहित नसतं?
संजय : माहीत असतं पण तितकं ते समजत नाही. बॉक्स ऑफिस हा शब्दच खूप भयानक, खतरनाक आहे. माझी पहिली फिल्म खामोशी जेव्हा रिलीज झालेली तेव्हा सकाळीच माझ्या एक्झिक्यूटीव्ह प्रोड्युसरचा मला फोन आलेला की, ‘फिल्म बैठ गयी’, मी म्हटलं म्हणजे, मला ती भाषाच मुळात समजली नव्हती. मग त्यांनी सांगितलं बसली म्हणजे चालली नाही असं झालं, तसं झाली. त्यामुळे त्या दिवसानंतर शुक्रवारी मी कधीच फोन उचलत नाही, मी फार घाबरतो. बॉक्स ऑफिस हे एक ऑफिस आहे जिथे मला कधीच जावंस वाटत नाही. फार भीती वाटते.
कोमल नाहटा : तुम्हाला बॉक्स ऑफिसची एवढी  भिती वाटते. एकतर तुम्ही दिग्दर्शक आहात, पण बॉक्स ऑफिसची भीती असूनही तुम्ही आता निर्मातेही झाले आहात, तुम्ही स्वतः दिग्दर्शित करत नसलेल्या फिल्म निर्माते म्हणून करतही आहात, तर हे कसं काय ?
संजय : चित्रपटांवरील प्रेमामुळे. लोफर, प्रतिज्ञा, फकिरा अशा फिल्म पाहून मी मोठा झालोय, त्यातूनच रावडी राठोड सारखी फिल्म बनवावीशी वाटली. माझं इन्टेंशन खूप क्लियर आहे की,  आय वॉन्ट टू मेक माय फिल्म. आय डोन्ट वॉन्ट टू मेक मनी.
कोमल नाहटा : कदाचित यामुळेच रावडी राठोड  भन्साळी दिग्दर्शित करू शकत नाही असं वाटणं……
संजय : का ?
कोमल नाहटा : मला खरंच माहीत नाही.
संजय : पण का ?
कोमल नाहटा : मला खरंच असं वाटत नाही की तुम्ही अशी फिल्म दिग्दर्शित करू शकता ?
संजय : बिलकुल. माझी रेंज आहे मी ब्लॅक करू शकतो, खामोशी करू शकतो.
कोमल नाहटा : नाही नाही मी तुमच्या रेंजवर प्रश्न उठवत नाहीये…
संजय : मला रावडी राठोड फार आवडलीये,फार अभिमान वाटतो त्या फिल्मचा. चंदन टॉकीजमध्ये जेव्हा मी ती फिल्म ते वातावरण पाहिलं तेव्हा मी स्वतः पैसे उडवले होते, तेव्हा वाटलं की, ये हुई ना बात. सर्व सामान्य माणसाला ज्यामुळे मनोरंजन मिळत ती खरी कला आहे. ब-याच जणांना वाटतं की, रावडी राठोड माझ्या टाईपची फिल्म नाही, का नाही, मी तर लोफर पाहूनच मोठा झालोय, तर माझा हा सिनेमा तर तसाच आहे. धिस इज बॉलीवूड.
कोमल नाहटा : तर एक निर्माता म्हणून तुम्ही हे कसं ठरवता ?
संजय : नाही, ही गणित मी  करत नाही. सावरियाँ चालली नाही, तेव्हा ब-याच जणांना वाटलं की  भन्साळी इज ओव्हर वगैरै वगैरे. पण मी त्यानंतर थेट ऋतिकला घेऊन गुजारिश केली. ज्या ऋतिकला सतत नाचताना पाहण्याची सर्वांना आवड आणि सवय होती, त्याला मी ह्या फिल्ममध्ये झोपवलं. तेव्हा लोक म्हणाले की, हे तर हाराकरी आहे, मी म्हटलं मी माझ्या जे मनात येतं तेच मी करतो.
कोमल नाहटा : त्यांना सांगायचं हे हाराकरी नाही, हा युथोनेशिया आहे.
संजय : तेव्हा मला ती गोष्ट सांगायची होती, ते डोक्यातून जात नव्हतं. बाजीराव तर १२ वर्ष डोक्यात होतं, ते तर तलवार घेऊन सतत डोक्यात फिरत होतं. त्यामुळे ते करायचं असेल तर मी त्या गणितांचा विचार  करत बसत नाही. एखादी गोष्ट मनाला स्पर्शून गेली तर मग दिग्दर्शक म्हणून असो वा निर्माता म्हणून असो मला ती फिल्म करायची असते.
कोमल नाहटा : तर तुम्ही एवढी सगळी डिपार्टमेंट सांभाळता, कसं करता हे सगळं. तुम्ही झोपतच नाही का ?
संजय : नाही ५-६ तास झोपतो, पण डोक्यात सुरू असतंच उद्या हे करायचंय…
कोमल नाहटा : आता म्युझिक. त्यासाठी काही म्युझिक डायरेक्टरर्सची टीम असते. पण तुम्ही ती देखील  ठेवत नाही…
संजय : पण कोमलजी मी चांगलं म्युझिक केलंय..
कोमल नाहटा : हो, तुम्ही चांगलंच केलंय. मला तसं म्हणायचं नाहीये. पण असं आहे की, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही म्य़ुझिकही करता, कॉश्च्यूमही पाहता. असं म्हणतात काही जण की, कपड्यांचा एक धागा देखील तुमच्या नजरेतून सुटत नाही.
संजय : आता त्याला काय करायचं,कान पण तसेच आहे, डोळे, डोकं पण तसंच आहे. पण मला म्युझिक फार आवडतं.
कोमल नाहटा : तुम्ही शांत राहण्यासाठी वा रिलॅक्स राहण्यासाठी काय करता ?
संजय : म्युझिक वा काम. मी रिलॅक्स राहण्यासाठी काम करतो. मी माझ काम खूप एन्जॉय करतो. तेच माझ्यासाठी रिलॅक्स होणं आहे, सुट्ट्या आहेत, मज्जा आहे, माझी देवाला एवढीच प्रार्थना आहे की माझं डोकं असंच चालू दे. अजूनही डोक्यात बरंच काही आहे, बरंच काही सांगायचं आहे. असं नाहीये की मला फिल्म करायचीये,फक्त पैसे कमवायचेत तर ते तसं नसून मला तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे. कृतीमधून, पात्रांमधून, तर ते चालू रहावं असं वाटतं.
कोमल नाहटा : प्रियंका चोप्रा,दिपिका पादुकोण, रणबीर सिंग अल्टीमेटली ही तीन नावं कशी निवडली तुम्ही आणि का ?
संजय : मी रामलीला करत होतो तेव्हाच बाजीरावची कास्टिंग पण चालू होती. दिपिकाशी चांगलं ट्युनिंग जमलं होतं. ती खूप सुंदर आहे. तिच्यात खूप टॅलेन्ट आहे,तिने चांगला सुर,चांगली लय आता पकडलीये. या दोन गोष्टींशिवाय चांगली कृती होऊ शकत नाही. रणबीरमध्ये मॅडनेस आहे. मला असं वाटलं की, ह्याला मी जसा पाहिजे तसा फिरवू शकतो. त्याच्यात ते सगळं मटेरियल आहे जे एक दिग्दर्शक म्हणून मी वापरू शकतो. कमिटमेन्ट खूप कमालचं आहे, केमिस्ट्री कमालीची आहे, ते दोघेही मला फार आवडतात, त्यांनाही मी तितकाच आवडतो. आणि प्रियंका म्हटलं की मेरी कॉम, राम चाहे लीला, ती एक भन्नाट अभिनेत्री आहे, व्यक्तिमत्त्व आहे. ती आल्यावर एक वादळ घेऊनच येते, ती आल्यावर एक ड्रामा होतो. नौटंकी होते. शी इज फुल ऑफ लाईफ.
कोमल नाहटा : म्हणजे मला असं वाटतं की, तुमच्याकडे ते स्वतःला सोपवून देत असतात.
संजय : हो मलाही तसंच वाटतं, पण मी त्यांना त्यांचं स्वातंत्र्यही देतो. एखादी लाईन कशी बोलायची हे मी त्यांना हवं तसं त्यांच्या पध्दतीने करण्याचं स्वातंत्र्य देतो. त्यामुळे त्यांचं मला सोपवणं आणि माझं त्यांना मोकळीक देणं हे एक भन्नाट समीकरण आहे.
कोमल नाहटा : ही गोष्ट दुस-या कुणीतरी लिहिलेली आहे, पण ही कथा प्रियंका, दिपिका आणि रणबीरला घेऊन करताना तुम्ही त्या पात्रांमध्ये काही बदल केलेत का ?
संजय : नाही, ते बरोबर नाही. ते जे कॅरेक्टर आहेत ते आहेत. तुम्ही स्वतःत बदल करून त्या पात्रांना करा, पण तुमच्यासाठी पात्रात बदल होणार नाही.
कोमल नाहटा : तुम्ही एवढे परफेक्शनिस्ट असूनही तुम्ही रणबीरला त्या पात्रासाठी केस काढून टाकण्याबरोबरच नकली टोप वापरण्याचाही पर्याय दिला होता. अर्थात त्याने केस कापणं पसंत केलं पण त्याने तसं केलं नसतं तर…तुम्ही त्याला तसं करण्याची सक्ती का नाही केली ?
संजय : माझी इच्छा होती की ते त्याने स्वतःहून करावं. ते मनापासून करणं फार महत्तवाचं होतं.
कोमल नाहटा : अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा दिग्दर्शकाला फार आनंद होत असेल ना, जेव्हा कलाकार एखादी गोष्ट पूर्णपणे हवी तशी करतात.
संजय : हो. कारण तेव्हा वाटतं की, आपण एकटे नाही आहोत. ही त्यांची देखील फिल्म आहे, ते ही तेवढीच मेहनत करत आहेत. माझ्या कॅमेरामेनने ह्या फिल्म मध्ये बेमिसाल काम केलंय, लेखकानेसु्द्धा. मी तुमच्यासमोर बसून ही मुलाखत करत असलो तरी ही त्या सर्वांची फिल्म आहे.
कोमल नाहटा : फिल्म नेमकी कुठे तयार होते, रायटिंग टेबलवर, स्टुडिओ फ्लोअरवर की एडिटिंग टेबलवर ?
संजय : मला असं वाटतं की, ह्या तिन्ही स्टेज फार महत्त्वाच्या आहेत.
कोमल नाहटा : आता तुमच्यासारखा माणूस ज्यांचे सेट फार भव्य दिव्य असतात, सगळं फार मोठं असतं , तर यात एडिटिंग करणं किती कठिण होत असेल ?
संजय : मी खरं तर पेपरवरच एडिट करून ठेवतो, त्यामुळे आम्ही फार कमी एडिट करतो. जे आहे ते जसंच्या तसं सीनमध्ये दिसतं. कधी कधी एखादा डायलॉग कट होत असेल, तर इच्छा नसतानाही ते एडिट करावं लागतं. प्रेक्षक वर्ग एवढा कमाल असतो की त्यांना त्या दोन तासात कळतं फिल्ममध्ये किती फ्लोअर होते, काय होतं, जे तुम्हाला दोन वर्षात नाही कळलं ते प्रेक्षकांना त्या दोन तासात कळतं.
कोमल नाहटा : तुमच्यातलं कमालीचं काय आहे, कोरिओग्राफी, ड्रामॅटिक सीन, वॉर सीन, लव्हसीन की आणखी काही ?
संजय : वॉर सीन तर खूप कापत कापत केले. कौशलने तर त्यात कमाल केली आहे . रामलीलाच्या वेळेस अॅक्शन सीन पाहून तो म्हणाला होता की आता मी सही ट्रॅकवर येतोय. नाही तर फक्त कानाखाली मारण्यासाठी मी त्याला बोलवायचो.
कोमल नाहटा : पण आता तुमच्या ह्या वॉरसीनची तुलना हॉलीवुड फिल्मशी करण्यात येते, कसं वाटतं तुम्हाला  ?
संजय : इनक्रेडीबल. बरेच जण म्हणाले होते की, अॅक्शन डायरेक्टर, टेक्निशियन तुम्ही विदेशातून बोलवा. मी म्हटलं कशाला , आमचे श्याम कौशल कोणापेक्षा कमी नाहीयेत. त्यांनी ते सीन काय मस्त केलेत.  मी ह्या फिल्ममध्ये सगळंच एन्जॉय केलंय. कोरिओग्राफीपासून, गाण्याचं रेकॉर्डिग सगळंच.
कोमल नाहटा : कन्टेम्पररी फिल्म मेकरचा विचार केला तर कोणाचं काम तुम्हाला जास्त आवडतं  ?
संजय : तुम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारताय  ?
कोमल नाहटा : नाही.
संजय : पण तसा विचार केला तर मला अनुराग बासूंचं काम आवडतं. आता सुजित सरकारचं काम मला आवडतं, आनंद गांधी ज्यांनी शिप ऑफ थिसेस केलेली त्यांचं काम फार आवडलं. ते खूपच चांगले दिग्दर्शक आहेत .
कोमल नाहटा : दिलवाले पण येत आहे. हे बरोबर वाटतंय का की दोन्ही मोठ्या फिल्म सुट्टी नसताना, सण नसताना एकाच दिवशी रिलीज होत आहेत.
संजय : नाही, बरोबर  म्हणता येणार नाही. आम्ही आमची फिल्म जो दिवस ठरवला होता त्याच दिवशी रिलीज केली. त्यात बदल केला गेला नाही. एक वर्षापूर्वीच त्याचं नियोजन केलं गेलं होतं. दिलवालेची तारीख नंतर सर्वांना समजली. तेव्हा सर्वांनाच टेन्शन आलं होतं. हे चूकीचं नाहीये. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शाहरूख हा माझा खूपच चांगला मित्र आहे. त्यामुळे मला अजिबात ही स्पर्धा वाटत नाहीये.
कोमल नाहटा : तुम्ही एवढे चांगले मित्र आहात तर तुम्ही एकत्र बसून त्याविषयी योग्य निर्णय का घेतला नाही  ?
संजय : ते योग्य ठरलं नसतं. दोघांसाठीही.
कोमल नाहटा : ट्रेडमध्ये कोणी खुश वाटत नाहीये. खासकरून एक्झीबिशन ट्रेड, कारण त्यांचं नुकसान सरळ सरळ पुढे दिसतंय. तसं नसतं तर त्यांनी सहा महिने दिवाळी साजरी केली असती.
संजय : आता यावर मी काय बोलणार, असंही होऊ शकतं की दोन्ही फिल्म चालू शकतात. पण ही एक चांगली गोष्ट आहे की दोन्ही टीमकडून काही निगेटि्ह वाईब्स येत नाहीयेत. दोन्ही फिल्म फार वेगळ्या आहेत. तुम्ही दोन्ही पाहू शकता.
कोमल नाहटा : धन्यवाद संजय सर.

मुलाखत : संजय लीला भन्साळी
मुलाखतकार : कोमल नाहटा
स्त्रोत : ETC
शब्दांकन : सुजाता शिरसाठ

Comments
आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व

More in आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व