घटना

जातिय भेदभावाचा बळी रोहिथ

जातिय भेदभावाचा बळी रोहिथ
मुलाखतकार

रोहिथच्या जातीने अन्यायकारक शिक्षेला सोप्प केलं- दत्तात्रय आणि ईराणी यासाठी जबाबदार आहेत – रामजी

hyderabad-1453379378

जातिय भेदभावाचा बळीरोहिथ, रोहिथचे  जिवलग मित्र  रामजी यांची ही खास मुलाखत.
हैदराबाद युनिवर्सिटीमध्ये पीएचडीचा विद्यार्थी असणा-या रोहिथ वेमुल्लाने केलेल्या आत्महत्येसंदर्भात ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ च्या रोहित ई डेविड यांनी रोहिथचे मित्र रामजी यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत. जे हैदराबाद युनिवर्सिटीमध्ये आंबेडकर स्टुडंट असोसिएशन(ASA)चे अध्यक्ष आहेत. ते रोहिथच्या आत्महत्येमुळे अस्वस्थ असून त्यांनी रोहिथविषयी नि घडलेल्या घटनेविषयी विस्तृृतपणे सांगितलं आहे.

रोहिथला काय आवडायचं ?
उ-  रोहिथ एक जिंदादिल, प्रेरक, हसमुख असं व्यक्तिमत्त्व होतं. त्याला शिकायला फार आवडायचं आणि तो खूप हुशारही होता. त्याची आई एक रोजनदारीवर काम करणारी कामगार आहे आणि वडिल सिक्युरिटी गार्ड आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना निलंबित केलं असताना रोहितनेच हे पाऊल का उचललं ?

1_1453658877
उ- निराशा वाढत चालली होती. आम्ही सरकारला चुकिचं ठरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण आमचे कुलगुरूच आमच्यासोबत नव्हते. आम्हाला निलंबित करण्याचा निर्णय कळल्यावर रोहिथने कुलगुरूंना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्याने विद्यापीठात वाढत असलेल्या दलितांच्या समस्यांविषयी लिहिलं होतं. पण कुलगुरूंनी त्याचं उत्तर कधीच दिलं नाही. रोहिथ त्याला निलंबित केल्याच्या निर्णयामुळे फारच निराश झाला होता. एका सामाजिक कार्यकर्ता असणा-या मुलावरील बहिष्काराच्या निर्णयानंतर सर्व निलंबित विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली. ज्यामुळे त्यांना उघड्यावर झोपावं लागत होतं. १३ दिवसांपासून अभाविपव्यतिरिक्त सर्व विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या या शिक्षेला विरोधा केला होता. पण शासनाकडून कोणीच आमची साधी दखलंही घेतली नाही .
एएसएचं कार्य काय आहे ?
उ- ‘मुजफ्फरनगर बाकी है’ या डॉक्यमेंट्रीच्या स्क्रीनिंगच्या वेळेस अभाविपने दिल्लीत केलेल्या हल्ल्याविरोधात एएसएने निदर्शन केलं होतं. त्यावर कोणी एका व्यक्तीने असं म्हटलं देखील होतं की,’एएसएचे गुंड गुंडागर्दीविषयीच नेहमी बोलतात’. एएसएने त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्या व्यक्तिशी संपर्कही केला. तेव्हा त्याने सुरक्षा अधिका-यासमोर याविषयी लिखित माफीदेखील मागितली होती. नंतर त्याच व्यक्तिने आरोप केला की, एएसएच्या सदस्यांनी त्याला मारलं. या आरोपानंतर प्रोक्टोरियल बोर्डतर्फे तपासही करण्यात आला, पण त्यांना एएसएने केलेल्या मारहाणीविषयी कुठलाच पुरावा मिळाला नाही. त्यावर त्या संदर्भातील समितीने एएसएला क्लीन चीट दिली आणि त्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात आलं.
यात सरकारची काही भुमिका आहे असं तुम्हाला वाटतं का ?

protest-nsui-1453199796

उ- आम्ही रोहिथच्या आत्महत्येसाठी दत्तात्रय आणि ईराणी यांना जबाबदार धरतो. आम्हाला देशद्रोही संबोधण्यात आलं होतं. हेच आम्हाला असहाय्य करणारं होतं. आम्ही आंबेडकारांना मानतो आणि हिंदुत्त्ववादी विचाराधारेवर प्रश्न उभे करतो- त्यामुळे ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला तपासादरम्यान एएसए विरोधात कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांतून दोन साक्षीदार आणण्यात आले. पण जबाबामध्ये असं लिहिलं गेलं होतं की, त्या व्यक्तिला मारहाण झाली तेव्हा त्या ठिकाणी तो एकटाच होता, मग हे साक्षीदार आले कुठून? शिवाय एक पत्र मानव संसाधन मंत्रालयादेखील पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये असं लिहिलं होतं की एएसए सांप्रदायिक, जातियवादी आणि देशद्रोही कारावायांमध्ये सहभागी आहे. मंत्रालयाने विद्यापीठाला या कारवायांविरूध्द काय कारवाई केली गेली असं विचारलं. त्यामुळे मंत्रालयाच्या दबावावरून आमच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल. याच कारणामुळे आमचं निलंबन झालं होतं.
केवळ जातीमुळे रोहितशी भेदभाव केला जात होता का ?
उ- हो. तो दलित जातीतला होता म्हणूनच तर त्याला कोणाचा पाठिंबा मिळाला नाही. जातीच्या मुद्दयावरून त्याने दक्षिणपंथीय आणि त्याच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली. त्याच्या प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केलं. दक्षिणपंथी शक्ति त्याच्या अभिव्यक्ति स्वांतत्र्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायच्या, ज्यामुळे तो अजूनच पेटून उठायचा. पण तो अन्यायकारक शिक्षेचा बळी ठरला.
हा खूप मोठा संदेश आहे का ?
उ- हो. हिंदुत्ववादाच्या अजेंड्याविरोधात सर्व विद्यापीठात निदर्शने होत आहेत.
तुम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहात का ?

400x400_IMAGE48657960
उ- हो. आम्ही राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत व समाधानी आहोत. त्यामुळे आपला अजेंडा चुकीचा आहे हे भाजपने आता समजून घेण्याची गरज आहे. संसदेत सर्वांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत नाहीतर ते हुकुमशाह बनतील.

rohith-vemula-protest-759-620x400

मुलाखत : रामजी
मुलाखतकार : रोहित ई डेविड
स्त्रोत : द टाइम्स ऑफ इंडिया

Comments

More in घटना