भूमिका

गुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री

गुंतागुंतीच्या स्त्री व्यक्तिरेखांतून उलगडलेली अभिनेत्री
मुलाखतकार

आयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखिल वागळे ह्यांनी ग्रेट भेट मध्य़े रिमा लागूंची घेतलेली ही खास मुलाखत. रिमा लागू ज्यांना आजवर आपण ब-याच बॉलिवुडच्या नट-नट्यांच्या आईच्या भुमिकेत पाहिलं आहे त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासाविषयी बरंच काही भरभरून सांगणारी ही मुलाखत आहे. रिमा लागूंनी त्यांच्या आयुष्यात चित्रपटांपेक्षाही नाटकांमधून फार चांगली पात्रं, व्यक्तिरेखा केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी नाही चालू शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. तर त्यांचा हा प्रवास कुठून सुरू झाला, विजयाबाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करतानाचा अनुभव कसा होता, त्यांच्या काळातला प्रेक्षकवर्ग कसा होता, त्यांच्या नाटकाविषयी प्रेक्षकांची काय मते होती, ‘पुरूष’ वा ‘घर तिघांचं हवं’ ही नाटके करतानाचा त्यांचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत तुम्ही पहाच.

मुलाखत : रिमा लागू
मुलाखतकार :  निखिल वागळे
स्त्रोत : आयबीएन लोकमत

Comments

More in भूमिका