कवी

विद्रोह आणि मल्लिका

विद्रोह आणि मल्लिका
मुलाखतकार

पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत,
तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाहीत – मल्लिका अमर शेख

किती दूरवर जमिनीत पसरलीयत माझी मुळं
आता एवढे सोपे नाही गड्यांनो
माझी मुळं उखडून मला फेकून देणं –  नामदेव ढसाळ

एबीपी माझाच्या माझा कोलाज या कार्यक्रमात घेण्यात आलेली मल्लिका अमर शेख आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांची ही खास मुलाखत. मल्लिका अमर शेख या एक प्रगल्भ लेखिका आणि नामदेव ढसाळ हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नि बंडखोर कवी. या दोघांच्याही कवितांमध्ये विद्रोह उफाळून येताना दिसतो. दोघेही ताकदीचे लेखक-कवी असले तरी एक दाम्पत्य म्हणून ते कसे आहेत?  या दोन्ही प्रगल्भ व्यक्तिंचे जेव्हा टोकाचे वाद होतात तेव्हा त्याचं काय कारण असू शकतं? काय अपेक्षा असतात? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या मुलाखतीत मिळतील. मल्लिकाजी व नामदेव ढसाळ एकत्र कसे आले, ही विद्रोहाची प्रेमकहाणी आपल्याला येथे त्यांच्याचकडून ऐकायला मिळते. मल्लिका अमर शेख जेव्हा ”मला उध्वस्त व्हायचंय” हे पुस्तक मला त्याने सोडून जावं म्हणून लिहिलं असं म्हणतात, तेव्हा त्यामागे काय कारण असतं ते या मुलाखतीत उलगडताना दिसतं. शिवाय नामदेव हे न संपणारं पुस्तक आहे असं मल्लिकाजींना का वाटतं हे ही या मुलाखतीत आपल्याला समजते. त्यामुळे या विद्रोही जोडीविषयी आणखी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.

मुलाखत : मल्लिका अमर शेख आणि पद्मश्री नामदेव ढसाळ
स्त्रोत : एबीपी माझा

Comments

More in कवी