इतर मुलाखत

बातचीत मेघना गुलजारशी……..

बातचीत मेघना गुलजारशी……..
मुलाखतकार

बॉलिवूड हंगामा तर्फे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तलवार चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी केलेली ही खास बातचीत. ज्यात त्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाबद्दल, ह्या विषयाबद्दल, कलाकारांबद्दल बोलताना आढळतात. २०१३ मधील आरुषी तलवार हत्या प्रकरण जे खूप चर्चेत राहिलं. बरेच युक्तिवाद, चर्चा झाल्या या प्रकरणावर. आई-वडिलांनीच आपल्या मुलीचा खून केल्यामुळे हे प्रकरण विशेष चर्चेत राहिले. प्रकरणाचा शेवट तलवार दाम्पत्याला न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेने झाला. याच प्रकरणावर आधारित हा चित्रपट हे प्रकरण सर्व खुलास्यांसोबत प्रेषकांसमोर मांडण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करताना काय अडचणी आल्या, कशी शोधमोहिम राबवण्यात आली या विषयी त्या सांगतात. चित्रपटातील कलाकारामुळे कसं सगळं सोयीस्कर झालं, त्याच बरोबर आपल्या या पुढील प्रोजोक्टस बद्दलही त्या बोलल्या. त्याच बरोबर आपल्या चित्रपटांच्या शैलीमुळे आपली तुलना विशाल भारद्वाजांशी करण्यात येते हे ही त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यामुळे अशा या दिग्दर्शिकेची ही खास मुलाखत नक्की पहा.

 
मुलाखत :-  मेघना गुलजार
स्त्रोत :-  बॉलिवुड हंगामा

Comments

More in इतर मुलाखत