राजकारण

यादव असल्यामुळे आमच्यावर सतत आरोप होत असतात : लालू प्रसाद यादव

यादव असल्यामुळे आमच्यावर सतत आरोप होत असतात : लालू प्रसाद यादव
मुलाखतकार

इनफोकस तर्फे करण थापर यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची घेतलेली ही खास मुलाखत. मुलाखतीत करण यांनी लालूंना राजकरणातून निवृत्ती कधी घेेणार याविषयी विचारले असता, राजकारणात माणूस मरणानंतरच निवृत्त होतो त्यामुळे मी आत्ताच निवृत्त होण्याचा प्रश्नच उरत नाही, असे रंजक उत्तर देवून लालूंनी चर्चेला वेगळेच वळण दिले.
त्यावेळेस(2012 सालची ही मुलाखत आहे) होणा-या निवडणुकीत लालू पुन्हा उमेद्वार म्हणून उभे राहणार का असे विचारले असता लालूंनी या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत आपणच या निवडणुकीत जिंकू असा निर्धारही व्यक्त केला. त्याचबरोबर या निवडणुकीत त्यांचे शत्रु कोण आणि मित्र कोण शिवाय सामंतराय यांच्या विषयी जनता दल पक्षाची काय भूमिका असणार आहे, त्या मागील कारणे यावरही वादात्मक चर्चा या मुलाखतीत होताना दिसते. त्याच बरोबर सर्वात महत्त्वाचा मुददा म्हणजे त्यांच्यावर चारा घोटाळा  आणि इतर घोटाळ्यांच्या आरोपाखाली सीबीआय चौकशी होत असतानादेखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता निवडणुकीत पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतलाच कसा यावर करण यांनी त्यांंच्यावर प्रश्नांची चांगलीच झोड उठवली आहे.  त्यावर प्रत्युत्तर देत आपण यादव असल्यामुळे आपल्यावर असे बिनबुडाचे आरोप होत असल्याचे सांगत लालूंनी आपण कधीच या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे बेधडकपणे सांगितले. शिवाय बिहार हे आता  क्रिमिनल-फॅसिस्ट पक्ष- सांप्रदायिक पक्षाचे लक्ष होत आहे असे म्हणत लालूंनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ही मुलाखत नक्की बघा. ह्या मुलाखतीचे शब्दांकन संक्षिप्तस्वरूपात खालीलप्रमाणे

करण थापर – तुम्ही जनता दलाच्या अध्यक्ष पदासाठी उभे राहत आहात… तुम्ही आता राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करत आहात की येत्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणार आहात ?

लालू यादव – माझं निवृत्ती घेण्याचं हे वय नाहिये. सरकारी सेवेतील लोक 58 वर्षाचे असताना निवृत्त होतात आणि राजकारणात मरणोत्तरच निवृत्ती मिळते त्यामुळे आता निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही.

करण थापर – म्हणजे तुम्ही तुमची उमेद्वारी मागे घेणार नाहीत तर…

लालू यादव – हा प्रश्नच उरत नाही. मी जेव्हा उमेद्वार म्हणुन उभाही नव्हतो अशा वेळेस मला जनता दलाचं अध्यक्ष करण्यात आलं. नि आताही जनता दल पक्षाचा अध्यक्ष म्हणुन मी बिहारच्या जनतेला आव्हान करतो की आम्ही त्यांची सेवा केली असेल तर त्यांनी आम्हाला मतदान करून निवडून आणावं.

करण थापर – पण लालूजी आव्हान करणं वेगळं नि प्रत्यक्षात जिंकण हे वेगळं असतं.. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जिंकाल का ?

लालू यादव – आम्हीच जिंकू. मतदार ज्यांच्यासोबत असतो तोच पक्ष जिंकतो.

करण थापर – पण लालूजी प्रत्येक पक्षाचा उमेदवार आम्हीच जिंकणार हेच म्हणतो..

लालू यादव –एकदा मीडीयाने असं प्रसारित केलं हातं कि लालू या निवडणुकीत नाही जिंकणार, पण मायऩॉरिटी असुनही मीच त्यावेळेस जिंकलो होतो. मी निवडुन येणार नाही असा सर्वत्र प्रचार होत असताना देखील बिहारच्या जनतेने मला निवडून दिलं. 170जागांपैकी आमच्या 134 जागा आल्या होत्या.

करण थापर- तुम्हाला काय म्हणायचंय मग दिल्लीतही असाच निकाल लागणार का ?

लालू यादव – हो.

करण थापर – जर तुम्ही जिंकलात तर तुमची मेज़ॉरिटी कितीची असेल, शरद यादव किती वाईट पध्दतीने हरू शकतील. काय सांगाल?

लालू यादव – मायऩॉरिटी – मेज़ॉरिटी चा प्रश्न नाही. जनता दलाचा मजबूत जनाधार बिहार-ओडिसा नि कर्नाटक आहे.

करण थापर- आणि ते सगळे तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला वाटतं ?

लालू यादव – नक्कीच.

करण थापर – पण वृत्तपत्रांमध्ये असं छापून आलंय की जनता दलाचे युपी, कर्नाटक, तमिळनाडू येथील अध्यक्ष  तर तुम्ही निवडणुकीत उभं राहू नयेत असं सुचवताहेत..

लालू यादव – जे स्वतः एक आमदार निवडुन आणू शकत नाही, निवडणुक जिंकू शकत नाही, त्यांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही.

करण थापर – जनता दलातील कोणते लीडर तुमच्यासोबत आहेत ?

लालू यादव – मेजॉरटी लीडर माझ्यासोबत आहेत, मी कोणाचं नाव आता घेणार नाही, ते उचित ठरणार नाही.

करण थापर- बिहारचे सर्व सभासद तुमच्या सोबत आहेत का ?

लालू यादव – हो आहेत.

करण थापर – रामविलास पासवान तर प्रयत्न करताहेत कि बिहारची सगळी मते तुम्हाला मिळू नयेत, असं वृत्तपत्रांमध्ये छापूनही येत आहे

लालू यादव – हे पहा रामविलास पासवान, जनता दल नि बिहार हे एकच आहे. नि अशा बातम्यांबद्दल म्हणाल तर रामविलास पासवान यांचा मला त्याबद्दल फोनही आला होता. त्यांनी स्वतः मला सांगितलं की माझ्या विरोधातील त्यांच्या छापून येणा-य़ा बातम्या ह्या पूर्णपणे खोट्या आहेत.

करण थापर – म्हणजे ते तुमच्या सोबत आहेत शरदजींसोबत नाहीत.

लालू यादव – हो.

करण थापर – आता मला हे सांगा तुमचे एक सपोर्टर आहेत रामकृपाल यादव ज्यांनी जनता दलाच्या खासदारांमध्ये  एक स्वाक्षरी मोहिम सुरू केली होती. त्या खासदारंपैकी किती जणांनी स्वाक्षरी केली होती ?

लालू यादव – असं काही झालं नाही याउलट मला सर्वांचा नेहमीच पाठिंबा होता.

करण थापर – म्हणजे तुम्हाला तुम्हीच जिंकणार असा पूर्ण विश्वास आहे. पण मग असं असूनही तुम्ही पटनामधून का निवडणुक लढत आहात. दिल्लीतून का नाही. सामंतराय यांनी तुमच्यावर आरोप केलाय कि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमचं निवडणुकीचं स्थळ निवडलं. जे खर तर चुकिचं आहे, नियमबाह्य आहे. एवढंच नाही तर 28-29 च्या रात्री तुमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केले नि तुम्ही त्यांना काहीच न बोलता ते सगळं निमुटपणे पाहत होतात.

लालू यादव – सामंतराय हा राजकारणी माणूस आहे. हे सगळं तो खूप चुकीच्या पध्दतीने नि हेतूने पसरवत आहे. मी त्यांना जनरल सेक्रेटरी बनवलं होतं. दुस-या वेळेस ते हरले.त्या रात्री मी त्यांना फोन केलेला की मी तुमच्याकडे येतो तर ते म्हणाले की मी येतो तुम्ही नका येऊ. पी.के प्रसाद पण तेव्हा तेथे होते. मी त्यांना मतदारांची यादी मागीतली तर ते म्हणाले की हि प्रत पूर्ण नाही. ती सामंतराय यांच्याकडे आहे, नंतर देऊ.त्यामुळे ते सांगताहेत तसं काहीच घडलं नाही. ते पूर्णपणे खोटं सांगताहेत.

करण थापर – मग तुम्ही हे सगळं तेव्हाच का नाही सर्वांना सांगितलं ?

लालू यादव – त्यांनी याविषयी न्यायालयात सांगितल्यानंतर मला नोटिस मिळाली नि तेव्हा मला हे सगळं कळलं, आपल्या राजकरणात एवढे भ्रष्ट लोक आहेत याची जाणीव मला तेव्हाच झाली.

करण थापर जर ते खोटं बोलत असतील तर त्यांनी रिटर्निंग ऑफिसर पद सोडावं वा त्यांना काढून टाकण्यात यावं असं तुम्हाला वाटतं का ?

लालू यादव – मी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहे. मी सामंतराय यांना सुरूवातीलाच सगळं काही स्पष्ट केलं होतं तरीही ते न्यायालयात गेले. आता न्यायालय काय निर्णय देईल त्याकडे आमची नजर आहे. नि जर सामंतराय यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक झाली तर तो खूप चुकीचा निर्णय असेल.

करण थापर- तुम्ही बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहात, जनता दल पक्षाचे अध्यक्ष नि त्याचबरोबर देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ अनुभवी राजकारणी आहात. तुमच्यावर सीबीआयने खूप गंभीर आरोप केले आहेत. असं असतानाही तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का देत नाही?

लालू यादव – समाजात मला बदनाम करण्यासाठी नि मी यादव असल्यामुळे असें आरोप होत आहेत. त्यांच्या आरोपात अजिबात दम नाहीये.

करण थापर- 1996 साली माधवराव संध्या, वी.सी.शुक्ला, बलराम झाकर यांच्या विरोधातही सीबीआयने चार्जशीट करण्याची परवानगी मागितली होती नि त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता.

लालू यादव – पण मी या खोट्या आरोपांसाठी माझ्या पदाचा राजीनामा का देऊ…

करण थापर – पण राजीनामा देऊन ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करून तुम्ही परत येऊ शकताच ना.

लालू यादव – हाच तर एक राजकीय खेळ आहे. मला या पदावरून बाजूला करण्यासाठीच हे सर्व प्रयत्न चालू आहेत.

करण थापर पण गुजराल साहेबांनी असं म्हटलंय की ते तुमच्या जागी असते तर त्यांनी नक्कीच राजीनामा दिला असता, तसं वृत्तपत्रातही छापून आलंय.

लालू यादव – हे पहा, मी त्यांच्यासारखा माणूस नाहीये. आता बिहार क्रिमिनल- फॅसिस्ट पक्षाचे- सांप्रदायिक पक्षाचे लक्ष होत आहे.

करण थापर- जर गर्व्हनरने सीबीआयला तुमची चार्जशीट करण्याची परवानगी दिली तर तुम्ही तेव्हातरी राजीनामा द्याल का ?

लालू यादव – मी या चार्जशीटला मानतच नाही.

करण थापर- म्हणजे चार्जशीट लागूनही तुम्ही मुख्यमंत्री असाल ?

लालू यादव – नक्कीच…मला हे खोटे आरोपपत्र मान्यच नाही. मी फक्त न्यायालयाच्या निर्णयाला मानतो. मी हे मुख्यमंत्री पद या कारणांमुळे सोडणार नाही.

करण थापर- म्हणजे तुम्हाला हुकुमत जास्त जवळची वाटते?

लालू यादव – नाही, असं काही नाही.

करण थापर –  न्यायालयात हरलात तर ..

लालू यादव – न्यायालयाचा निर्णय हा नेहमी मला मान्य असेल. पण पोलिसांचं मी काही ऐकणार नाही. हा सगळा एक राजकीय खेळ आहे.

शब्दांकन : सुजाता शिरसाठ

मुलाखत : लालू प्रसाद यादव 
मुलाखतकार : करण थापर
स्त्रोत : इनफोकस 

Comments

More in राजकारण