धर्म

जीवनाचं सार्थक भोगापेक्षा त्यागात अधिक – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

जीवनाचं सार्थक भोगापेक्षा त्यागात अधिक – फादर फ्रान्सिस दिब्रिटो
मुलाखतकार

आयबीएन लोकमतचे तत्त्कालीन संपादक निखिल वागळे यांनी ग्रेट भेट या कार्यक्रमात घेतलेली फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ही खास मुलाखत. रूढार्थाने धर्मगुरू अशी ज्यांची ओळख आहे, पण ज्यांच्याकडे पाहून आशा वाटते, प्रकाश वाट्याला येतो असे धर्मगुरू, साहित्यिक व समाजसेवक फादर दिब्रिटो. धर्माकडे डोळस पाहण्याची ज्यांच्याकडे दृष्टी आहे, ज्यांनी समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतला ते फादर दिब्रिटो, यांचा फादर होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल ते या मुलाखतीत सांगतात.
धर्मगुरू असले तरी ते एका जनआंदोलनाचे नेते देखील होते. वसईच्या १९८८ साली हरित वसईसाठीच्या लढ्यात ते नेते होते, त्यावेळच्या भाई ठाकूरच्या गुंडगिरी विरोधात मोठे जनांदोलन त्यांनी उभे केले होते. त्याआधी सुवार्ताचे त्यांनी संपादक म्हणूनही काम केले होते. त्यामुळे ते एक धर्मगुरू असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बरेच पैलू आहेत. या मुलाखतीत फादर दिब्रिटोंचे हे पैलू आपल्यासमोर येतातच, त्याचबरोबर वसईच्या मराठी ख्रिश्चन संस्कृतीच्या इतिहासाविषयी देखील फादर दिब्रिटों भरभरून बोलताना आढळतात. तर ह्या मुलाखतीच्या निमित्ताने या  मराठी ख्रिश्चन संस्कृतीविषयी नि बंडखोर धर्मगुरूविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.

मुलाखत : फादर फ्रान्सिस दिब्रिटो
मुलाखतकार : निखिल वागळे
स्त्रोत : आयबीएन लोकमत

भाग पहिला ज्यात वसईच्या मराठी ख्रिश्चन संस्कृतीविषयी आपल्याला माहिती मिळेल.

भाग दुसरा ज्यात फादर दिब्रिटोंची बंडखोर धर्मगुरू ही दुसरी बाजू पाहायला मिळते.

Comments

More in धर्म