अर्थकारण

जात नक्की संपणार – डॉ.नरेंद्र जाधव

जात नक्की संपणार – डॉ.नरेंद्र जाधव
मुलाखतकार


अर्थशास्त्रज्ञ,सामाजिक शास्त्रज्ञ,लेखक, शिक्षकतज्ञ,भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य,राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ.नरेंद्र जाधव यांची आयबीएन लोकमतचे तत्कालीन संपादक निखील वागळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत. ज्यात नरेंद्र जाधव त्यांच्या 'WHY ME TO WHY NOT ME',या त्यांच्या स्वत:चा शोध घेत स्वत:चजीवन रचण्याच्या प्रवासा बद्द्ल, नानाविध अनुभवांबद्दल सांगतात. 
आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित जाधव वडाळ्याच्या वस्तीतून सत्तेच्या अगदी जवळ जाऊन पोहचले,ते केवळ त्यांच्या इच्छाशक्तीमुळे. गल्लीचा दादा होण्याचे स्वप्न बाळगणारे नरेंद्र जाधव नियोजन आयोगाचे 
सदस्य कसे झाले, त्या टर्निंग पॉइंट बद्दल ते सांगतात.रिझर्व बॅंकेचे सल्लागार म्हणून काम करतानाचा अनुभव, इथिओपियामधील कामाचा,अफगाणिस्तानचे आर्थिक कौन्सिलर म्हणून काम करतानाचा,पुणे 
विद्यापीठाचे कुलगूरू पद सांभाळतानाच्या अनुभवाबद्दल ते भरभरून बोलतात. हे सगळं करत असताना आपल्याला आंबेडकर कसे भेटले याविषयी ते सांगतात. या संपूर्ण प्रवासात ते जात विसरले असले तरी 
इतर कसे जात विसरत नाहीत, त्यामुळे आलेल्या कटू प्रसंगांविषयी ते सांगतात. याविषयी बोलताना जात नक्की जाणार, आणि ती ग्लोबलायझेशनेच जाणार असा त्यांचा विश्वासही ते इथे व्यक्त करतात. 
त्यांच्या लग्नातून झालेल्या सामाजिक परिवर्तन तेसांगतात. आपल्या साहित्याविषयी सांगताना त्यांची २२ पुस्तके, आमचा बाप आणि आम्ही ची१५५ वीआवृत्ती,तिचे १८ते २० भाषांमध्ये झालेले भाषांतर याविषयी सांगताना,आपल्या साहित्याकडे महाराष्ट्राच्या सरकारचे कसे दुर्लक्ष आहे या विषयी देखील ते आपले मत व्यक्त करतात.मुलाखतीच्या सरतेशेवटी रवींद्रनाथ टागोर त्यांचे साहित्य, गांधी आणि आंबेडकर यांविषयी ते सविस्तरपणे बोलतात. आणि अखेरीस नरेंद्र जाधवांनी म्हटलेली टागोरांची कविता ही मुलाखतीला आणखी विशेष करते.

सदर मुलाखतीचा दुसरा भाग खालील व्हिडीओत आहे.


मुलाखत : डॉ.नरेंद्र जाधव  
मुलाखतकार : निखील वागळे 
स्त्रोत : आयबीएन लोकमत

Comments

More in अर्थकारण