भूमिका

दुबळ्यांचा साथी – पँथर

दुबळ्यांचा साथी – पँथर
मुलाखतकार

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त दलित पँथरविषय़ी भाष्य करणारी ही विशेष मुलाखत फक्त मुलाखत.कॉमच्या वाचकांसाठी. आरपीआयचे सरचिटणीस अविनाश महातेकर आणि दलित पँथरचे अध्यक्ष ज.वि.पवार ह्यांची ही जय महाराष्ट्र चॅनलमधील सामर्थ्य आहे चळवळीचे ह्या कार्यक्रमातील खास मुलाखत. दलित पँथर चळवळीची स्थापना मुळात कशी झाली, त्यामागे कोणता उद्देश होता, कोणते ध्येय डोळ्यांसमोर ही चळवळ सुरू झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या मुलाखतीत मिळतील. आजवर दलितांवर उच्च वर्णीयांकडून अनेक अत्याचाराच्या घटना आपल्यासमोर मिडियाच्या माध्यमातून सतत मांडण्यात आल्या, आजही त्या काही अंशी घडताना दिसतात. पण त्याच अत्याचारांना निमुटपणे सहन न करता त्या विरूद्ध लढण्य़ाची ताकद देणारी सशक्त चळवळ वा दुबळ्यांना साथ देणारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी चळवळ म्हणजे दलित पँथर. ह्या मुलाखतीचे विशेष म्हणजे या मुलाखतीत पद्मश्री नामदेव ढसाळ ह्यांचे दलित पँथर विषयीचे विचार आणि त्यांच्या सुरूवातीच्या काही लढ्यांच्या आठवणी ते येथे सांगताना आढळतात. दलित पँथरच्या सुरूवातीच्या काळातच राजा ढाले नि नामदेव ढसाळ असा वाद सुरू झाला होता. त्यातूनच पँथरची ही चळवळ व्यक्तिकेंद्री झाली असं म्हणतात, ते कसं  झालं हे ज.वि.पवार येथे सांगताना आढळतात. ढालेंच्या बुध्दिझममुळे नि ढसाळांच्या कम्युनिझममुळे कसे दोन वेगवेगळे गट पँथरमध्ये निर्माण झाले याचे कारण शिवाय ढसाळ आणि ढालेंचे त्याविषयीचे विचार आपल्याला या मुलाखतीत ऐकायला मिळतात. थोडक्यात दलित पँथर या चळवळीचे मुल्यमापन या मुलाखतीत केले गेेले आहे. त्यामुळे त्याविषयी आणखी जाणून घेण्य़ासाठी ही मुलाखत नक्की पहा. त्यासाठी क्लिक करा पुढील लिंकवर http://mulakhat.com/dalit-panther-2/

मुलाखत : ज.वि.पावर आणि अविनाश महातेकर
मुलाखतकार : मंदार फणसे
स्त्रोत : जय महाराष्ट्र

 

Comments

More in भूमिका