धर्म

Can’t think aspirational India without Muslims : असदुद्दिन ओवैसी

Can’t think aspirational India without Muslims : असदुद्दिन ओवैसी
मुलाखतकार

नेहमीच वाद आणि टिकांच्या सत्रात ओढले जाणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांची शेखर गुप्ता यांनी घेतलेली हि खास मुलाखत. ओवैसी म्हंटल कि हिंदू मुस्लिम वाद, वादग्रस्त वक्तव्य, भडक भाषणे हेच समोर येतं पण हि मुलाखत पाहिल्यावर कदाचीत त्यांची भूमिका समजायला मदतच होईल. सदर मुलाखतीत ओवैसी २०१२ च्या वादग्रस्त वक्तव्याचे परिणाम, कोर्टात खितपत पडलेले राम मंदिर प्रकरण, मक्का मस्जिद ब्लास्ट-त्याचे परिणाम, आर.एस. एस. संघ, काँग्रेस पक्ष याविषयी बोलतात.

२०१२ च्या वादातून आपण खूप शिकलो असून आपला भाऊ अकबरुद्दिन देखील आता विचारपूर्वक वक्तव्य करत असून त्या घटनेने आमच्या मतदार संघावर काहीच परिणाम झाला नसल्याचे ते सांगतात. विशेषतः राम मंदिर खटल्याच्या निर्णयाची आपण आतुरतेने वाट पाहत असून आर.एस. एस. संघ वा भाजप पक्षाचे भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याच्या स्वप्नाला आपला पूर्ण विरोध असून आपण तसे होऊ देणार नाही असेही ते सांगतात. शिवाय ‘terrorists don’t believe in any religion’ असं म्हणत मुस्लिम समाज भारताचाच एक भाग असून त्याकडे संशयी नजरेने पाहणाऱ्यांना ते जाब विचारताहेत. भारतातील हिंदू मुस्लिम वाद संपून संविधानाची अंमलबजावणी व्हावी सर्वांना सारखी वागणूक मिळावी अशी इच्छा ते येथे व्यक्त करतात. असदुद्दिन ओवैसी यांची हि दुसरी बाजू नक्कीच पहायला हवी.

मुलाखत : असदुद्दिन ओवैसी

मुलाखतकार : शेखर गुप्ता

स्त्रोत : NDTV

Comments

More in धर्म