मनोरंजन

नटसम्राटची चित्तरकथा

नटसम्राटची चित्तरकथा
मुलाखतकार

“कुणी घर देतं का ?…… घर?…… एका तुफानाला कुणी घर देतं का ?…….. एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून डोंगराडोंगरात हिंडतं आहे, जिथुन कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतं आहे…….. कुणी घर देतं कारे? ………. घर ?”
नटसम्राट. वि.वा.शिरवाडकर लिखित एक अजरामर कलाकृती. नटसम्राट हे नाटक पुन्हा एकदा लोकांसमोर आलं पण चित्रपट स्वरूपात. त्यामुळे जी पिढी ह्या नाट्यकृतीला मुकली होती तिलाही हा अप्रतिम अनुभव घेता आला. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला नि आज हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने प्रदर्शित झाला आहे. ह्याच चित्रपटाच्या अनुषंगाने आयबीएन लोकमतचे सिनेपत्रकार अमोल परचुरे यांनी महेश मांजरेकर नि नाना पाटेकर यांची घेतलेली ही खास मुलाखत.
महेश मांजरेकर नि नाना पाटेकर ह्यांनी एकत्र येऊन केलेली ही पहिलीच कलाकृती. कसा झाला ह्या चित्रपटाचा प्रवास, महेशने नानांचीच निवड या भुमिकेसाठी निवड का केली, नटसम्राट हे आव्हान मांजरेकरांनी कसं पेललं ह्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पहा.

मुलाखत : नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर
मुलाखतकार : अमोल परचुरे
स्त्रोत : आयबीएन लोकमत

Comments

More in मनोरंजन